नवी देहली – येथील कुतूबमिनारच्या बाहेर हिंदु संघटनांनी १० मे या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केले. तसेच त्यांनी हे मूळचे विष्णुस्तंभ असल्याने त्याला यापुढे ‘विष्णुस्तंभ’ म्हणण्याची घोषणा केली.
Members of Hindu organizations detained after reciting Hanuman Chalisa at Qutub Minar, were raising demand for renaming it to Vishnu Stambh https://t.co/K2AdGlaMxb
— OpIndia.com (@OpIndia_com) May 10, 2022
संघटनांनी म्हटले की, कुतूबमिनारजवळील हिंदूंची आणि जैनांची मंदिरे पाडून ‘कुव्वत-उल्-इस्लाम मशीद’ बांधण्यात आली आहे. आजही येथे देवतांच्या मूर्ती आहेत. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या मूर्तींची पुनर्प्रतिष्ठापना केली पाहिजे.