हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.

हिंदूंनो, ‘हलाल’ ही इस्लामी अर्थव्यवस्था मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत असून यासहित मोठी बहुराष्ट्रीय आस्थापनेही ‘१०० टक्के हलाल प्रमाणित’ असल्याची घोषणा करत आहेत. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात आहे.

दुर्गापूजेच्या काळात भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण

मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?

सूरत (गुजरात) येथे गरबा कार्यक्रमात तैनात मुसलमान सुरक्षारक्षकांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मुसलमान सुरक्षारक्षक कशाला ? हिंदूच असलेल्या आयोजकांना हे कळत कसे नाही ?

‘हिंदवी स्वराज्याचे व्रत’ कठोरपणे पालन करणारी पिढी निर्माण करणे हे आपले ध्येय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

धारकर्‍यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रबोधनापासून दूर राहून, शीलवान राहून राष्ट्रोत्कर्ष, राष्ट्रोद्धार यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे तेजात रममाण असणारा, असे आपल्या देशाचे नाव असून त्या वृत्तीची पिढी आपल्याला निर्माण करायची आहे – पू. भिडेगुरुजी

गोवा : डिचोली येथे श्री दुर्गामाता दौड आणि हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ !

माता जगदंबेची अखंड कृपा संपादन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र उभारणीसाठी एक शक्तीचा स्रोत या संपूर्ण परिसरात पसरला आहे, असेच चित्र दिसत होते. नवरात्रोत्सवातील साक्षात श्री दुर्गादेवीचे दर्शनच उपस्थित भाविकांनी अनुभवले !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याचा गरबा कार्यक्रमात सहभाग !

कीकडे हिंदूंच्या देवतांचा अवमान करायचा आणि दुसरीकडे त्याच देवतांच्या सणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे, असा दुटप्पीपणा करणार्‍यांना हिंदू प्रवेश देतातच कसे ? ही आत्मघातकी सहिष्णुता आणि गांधीगिरी इतकी वर्षे भारी पडली आहे, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?

देशात ‘५जी’ भ्रमणभाष सेवेचे उद्घाटन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर या दिवशी भारतातील ‘५जी’ भ्रमणभाष सेवेचे उद्घाटन केले. देशातील ‘जीओ’ आणि ‘एअरटेल’ या आस्थापनांनी देशात या सेवेचा प्रारंभ केला आहे. मुंबईसह देशातील ८ शहरांत सर्वप्रथम ही सेवा मिळणार आहे.

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्या वेळी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

जिजाऊमाता यांचा आदर्श आपण समोर ठेवून स्वातंत्र्याची, राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य आपण श्री दुर्गामातेजवळ मागूया !