सामाजिक माध्यमांतून टीका !
कर्णावती (गुजरात) – हिंदूंच्या देवतांचा स्वतःच्या कार्यक्रमांमधून अवमान करणारा विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी एका गरबा कार्यक्रमात सहभागी होऊन नृत्य करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ‘राज फूटप्रिंट’ या यू ट्यूब चॅनेलवरून तो प्रसारित झाल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र हा कार्यक्रम कुठे झाला आहे, हे समजू शकलेले नाही. फारुकीच्या सहभागावरून सामाजिक माध्यमांवरून त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. या व्हिडिओमध्ये गायिका फाल्गुनी पाठक गात असून मोठ्या संख्येने लोक गरबा नृत्य करत आहेत. त्यांच्यामध्येच मुनव्वर फारुकीही दिसत आहे.
सौजन्य ऑल इन वन न्यूज
संपादकीय भूमिकाएकीकडे हिंदूंच्या देवतांचा अवमान करायचा आणि दुसरीकडे त्याच देवतांच्या सणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे, असा दुटप्पीपणा करणार्यांना हिंदू प्रवेश देतातच कसे ? ही आत्मघातकी सहिष्णुता आणि गांधीगिरी इतकी वर्षे भारी पडली आहे, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ? आता फारुकीला गरब्याच्या स्थळी प्रवेश देणार्या हिंदूंवरही कारवाईची मागणी केली पाहिजे ! |