‘हिंदवी स्वराज्याचे व्रत’ कठोरपणे पालन करणारी पिढी निर्माण करणे हे आपले ध्येय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचा समारोप !

सांगली, ५ सप्टेंबर (वार्ता.) – येणार्‍या सव्वा वर्षाच्या कालखंडात आपल्याला रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापित करायचे आहे. या सिंहासनाच्या रक्षणासाठी, तेथे पहारा देण्यासाठी ‘हिंदवी स्वराज्याचे व्रत’ कठोरपणे पालन करणारी पिढी निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. धारकर्‍यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रबोधनापासून दूर राहून, शीलवान राहून राष्ट्रोत्कर्ष, राष्ट्रोद्धार यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे तेजात रममाण असणारा, असे आपल्या देशाचे नाव असून त्या वृत्तीची पिढी आपल्याला निर्माण करायची आहे, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना पू. भिडेगुरुजी

ते श्री दुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी मारुति चौक येथील शिवतीर्थावर बोलत होते. या प्रसंगी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पू. भिडेगुरुजींचे मार्गदर्शन ऐकतांना धारकरी
दौडीत सहभागी शस्त्रधारी पथकातील धारकरी

विशेष

१. दौडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मारुति चौक येथे भाजप प्रदेश सचिव श्री. पृथ्वीराज पवार, भाजप नगरसेवक श्री. सुब्राव मद्रासी यांसह अन्य कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले. बसस्थानक परिसरात सौ. मीना जाधव, सौ. सुषमा धनगेकर, सौ. माधुरी खोत, सर्वश्री एस्.डी. चव्हाण, विक्रम शिंदे, सोमनाथ धोत्रे, संजय स्वामी, राजू भावी, अमित कुलकर्णी, संजय तांदळे यांसह अन्य एस्.टी. कर्मचार्‍यांनी दौडीचे स्वागत केले. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर दौडीच्या स्वागतासाठी नागरिकांनी रांगोळ्या काढल्या होत्या.

सांगली बसस्थानकात दौडीचे स्वागत करणारे एस्.टी.चे कर्मचारी

२. सर्वांनी परिधान केलेल्या भगव्या फेट्यामुळे, तसेच अग्रभागी असलेल्या भगव्या ध्वजामुळे सांगली भगवीमय झाली होती. दौडीत युवती-महिला यांची संख्याही लक्षणीय होती.