दुर्गापूजेच्या काळात भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण

गोपालगंज (बिहार) – येथे हनुमान मंदिरात भक्तीगीते वाजवल्याच्या प्रकरणी मुसलमानांनी हिंदू महिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत घायाळ झाल्याने ३ महिलांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोल्डन अहमद, सोबराती आणि सदीदन खातून यांच्यासह अन्य २० अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

येथे श्री दुर्गापूजेनिमित्त सकाळी आणि सायंकाळी भोंग्यांवरून भक्तीगीते लावण्यात येत होती. याला येथील मुसलमानांकडून विरोध करण्यात येत होता. हिंदूंनी भोंगे बंद न केल्याने मुसलमानांनी हिंदु महिलांना मारहाण केली. त्यापूर्वी जेव्हा हिंदु तरुणी येथे पूजा करण्यासाठी येत असत, तेव्हा मुसलमान तरुण त्यांची छेड काढत होते.

खरगोन (मध्यप्रदेश) येथे हिंदु तरुणीला मुसलमान तरुणाकडून मारहाण

येथे एक २१ वर्षीय हिंदु तरुणी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असतांना मोईन खान या तरुणाने तिला मध्येच रोखले आणि कार्यक्रमात न जाण्यास सांगितले. तरुणीने त्याला विरोध केल्यावर मोईन याने तिला मारहाण केली. या वेळी स्थानिक नागरिकांनी मोईन याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. पोलिसांनी नंतर मोईन याला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?