|
मुंबई, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘हलाल’ ही इस्लामी संकल्पना ‘निधर्मी’ म्हणवणार्या भारतातील बहुसंख्य ७८ टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या जवळ ती पोचली आहे. ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खासगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून सहस्रो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत.
केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत असून यासहित मोठी बहुराष्ट्रीय आस्थापनेही ‘१०० टक्के हलाल प्रमाणित’ असल्याची घोषणा करत आहेत. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात असल्याची माहिती आहे. यामुळे हिंदूंनी या ‘हलाल जिहाद’चा प्रखर विरोध करून ती झटक्याने मोडून काढावी. सर्वांना जागृत करून शासनालाही यावर गंभीरपणे कृती करण्यास बाध्य करावे, असे आवाहन ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लेखक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात पुढील दिशा निश्चित करण्यासाठी ९ ऑक्टोबर या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘हलाल प्रमाणपत्र सक्तीविरोधी’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून परिषदेला संबोधित केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. विजय सोनकर शास्त्री, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, मेढे (वसई) येथील परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष श्री. मोतीलाल जैन, अखिल भारतीय खाटीक समाजाचे महाराष्ट्र प्रभारी श्री. विवेक घोलप, वीरशैव लिंगायत महासंघाचे श्री. विजय जंगम, झटका व्यावसायिक महासंघाचे सदस्य श्री. संतोष गुप्ता आदी मान्यवरांनी परिषदेत त्यांचे विचार मांडले.
निधर्मी भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या नावाखाली हिंदु व्यापार्यांकडून प्रतिवर्षी सहस्रो कोटी रुपये गोळा केले जात आहेत. व्यापारी आणि उद्योजक यांनी भारत शासनाच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)’ या अधिकृत संस्थेकडून प्रमाणपत्र घेतलेले असतांनाही खासगी मुसलमान संस्थांकडून हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्या या समांतर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी ‘हलाल परिषदे’चे आयोजनही करण्यात आले आहे. या परिषदेला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि व्यापारी यांच्याकडून विविध माध्यमांतून विरोध होत आहे.
हलालवर बहिष्कार टाकणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
हलाल प्रमाणपत्र पद्धती लादण्याचे काम आपल्या कायद्याने नव्हे, तर मुसलमानांनी केले आहे. अकबरच्या काळापासून ‘लव्ह जिहाद’ चालू आहे. आता ‘हलाल जिहाद’ चालू झाला आहे. हलाल प्रमाणपत्र हा आरंभ आहे. हलाल चंचूप्रवेश असून हिंदू जर त्याला सहन करीत राहिले, तर उद्या त्याचे आणखीन गंभीर आणि विपरित परिणाम होतील. हलालद्वारे जिहादी मुसलमान भारतासह जगावर राज्य करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. त्यामुळे या हलालवर बहिष्कार टाकणे, हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्य आहे. हिंदूंनी श्रीकृष्णनीती अवलंबून हलालवर आर्थिक बहिष्कार टाकावा. हलालला रोखण्यासाठी हिंदूंची कृती समिती निर्माण करून हलाल सक्तीला कडाडून विरोध करावा. हिंदूंनी आपले कष्टाचे पैसे फक्त हिंदु व्यापार्यांकडेच जातील, असा प्रण करावा.
हिंदूंना सावरकरांच्या बहिष्काराचे अस्त्र हाती घ्यावे लागेल ! – डॉ. विजय सोनकर शास्त्री, खासदार, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप
हलालपद्धती ही केवळ मांस कापण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आज सर्वच क्षेत्रांत हलाल अर्थव्यवस्थेने प्रवेश केला आहे. हलाल जिहाद हे हिंदूंच्या विरोधातील मोठे षड्यंत्र आहे. केंद्रातील रेल्वे प्रशासनाने ‘हलाल’ हा शब्द त्यांच्या सूचीतून काढून टाकला आहे. देहलीतील उपाहारगृहांनाही ‘मांस झटका आहे कि हलाल आहे ?, हे ग्राहकांना ठळकपणे दाखवून द्यावे’, असे तेथील महानगरपालिकेच्या भाजप प्रशासनाने सक्तीचे केले आहे. यामुळे हिंदूंना आता सावरकरांच्या बहिष्काराचे अस्त्र हाती घ्यावे लागेल.
हिंदूंनो, हलाल प्रमाणपत्राला विरोध करा आणि पुढची पिढी वाचवा ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते
आतंकवाद्यांना पोसणार्या मुसलमानांनी भारतासह जगभरात ‘हलाल प्रमाणपत्र’ नावाची अर्थव्यवस्था चालू केली आहे. त्यामुळे भविष्यात भारतासह जगावर मोठे वादळी संकट ओढवणार आहे. हलाल प्रमाणपत्र घेतलेल्या मॅकडोनाल्डमध्ये आपण एक बर्गर खातो, तेव्हा आपण एका आतंकवाद्याला पोसतो, हे लक्षात घ्या. या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेला आगामी २५ वर्षांत शह देण्याचा आणि ‘कसाब’सारखे आतंकवादी घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हळूहळू पसरत जाणारे विष असलेल्या या ‘हलाल प्रमाणपत्रा’चा उल्लेख आणि चिन्हे असलेली उत्पादने खरेदी न करता हिंदूंनी त्यांवर बहिष्कार टाकावा. हिंदूंनो, आताच जागे व्हा आणि आपली पुढची पिढी वाचवा. केंद्र आणि राज्य सरकारनेही या गंभीर प्रकरणात लक्ष घालायला हवे. अशी स्थिती निर्माण केली पाहिजे की, ‘हलाल प्रमाणपत्र असेल, तर भारतातील ग्राहक येत नाही.’
हे पहा –
✊🏻 हलाल विरोधी आंदोलन में ‘ऑनलाइन’ सहभागी हो ।
🟢 ‘हलाल सख्ती विरोधी परिषद’ एवं ‘हलाल जिहाद’ ग्रंथ लोकार्पण समारोह 🟢
********************************
🟢 ‘फेसबूक लाईव्ह’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमातून सहस्रोंनी घेतला परिषदेचा लाभ ! 🟢
♦ ‘हलाल प्रमाणपत्र सक्ती’विरोधी परिषदेचे Facebook.com/SavarkarSmarak आणि Facebook.com/JagoHinduMumbai या मार्गिकेवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. याचा २ सहस्र २४० जणांनी लाभ घेतला. ♦ ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून केलेल्या थेट प्रक्षेपणाचा लाभ ५ सहस्र ५५५ जणांनी घेतला. ♦थेट प्रक्षेपण पहाणार्या अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. |