(म्हणे) ‘पाकिस्तान काश्मीरचे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करील !’

काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, हे पाकिस्तानने नेहमीसाठीच लक्षात ठेवावे; मात्र पाकमधील राजकारण्यांना काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्याविना सत्तेवर बसता येत नाही, हेही तितकेच खरे आहे !

मध्यप्रदेशात काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा आदेश

काँग्रेसला आता कळून चुकले आहे की, इफ्तारच्या मेजवान्या करून पुन्हा सत्ता मिळवता येणार नसल्याने आता हिंदूंना खूश करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; मात्र हिंदूंना ‘काँग्रेसची ही ढोंगबाजी आहे’, हे ठाऊक आहे !

न्यायमूर्तींवरील टीकेच्या विरोधात आंध्रप्रदेश न्यायालयाचा निवाडा !

सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितले की, ज्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे नोंद आहेत, त्या खासदार आणि आमदार यांच्या विरोधातील खटले स्वतंत्र न्यायालयामध्ये चालवले जावेत. प्रशासन हे लाचखोर आणि सत्ताधारी यांच्या इशाऱ्यावर चालते. आता न्यायव्यवस्थेची ही स्थिती असेल, तर यावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमात्र उपाय आहे.’

राष्ट्रपतीपद सोडण्यास गोटबया राजपक्षे यांचा नकार !

श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक संकटामुळे अराजकसदृश्य स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती गोटबया राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र देण्याची विरोधी पक्षांची मागणी फेटाळली आहे. तसेच ‘संसदेत बहुमत सिद्ध करणार्‍या पक्षाला सत्ता सोपवण्यास आम्ही सिद्ध आहोत’, असेही त्यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड !

संजय राऊत यांची येथील १ सदनिका आणि रामनाथ (अलिबाग) येथील ८ भूखंड अशी एकूण ११ कोटी १५ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे.

मशिदींवर भोंगे लावले, तर मंदिरावर दुप्पट आवाजात ‘हनुमान चालीसा’ लावा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

कोणत्या धर्मात लिहिले आहे की, मशिदींवर भोंगे लावा ? जेव्हा धर्म लिहिला गेला, तेव्हा भोंगे होते का ? युरोपमध्ये ध्वनीवर्धक कुठे आहेत ? तुमच्या परमेश्वराला प्रार्थना करा; पण घरात राहून. प्रत्येकाने धर्म घरात ठेवला पाहिजे.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.

संभाजीनगर येथे युवा सेनेच्या मेळाव्यातच १५ मिनिटे हाणामारी !

कार्यकर्त्यांनी हाणामारी करू नये, यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना नैतिकमूल्ये शिकवणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !

नेतेमंडळी पुष्कळ भांडत असली, तरी संकट येताच सर्व एकत्र येतात ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

‘सामान्य परिस्थितीत नेतेमंडळी भांडतात’, असे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वक्तव्य करणे, यांसारखी देशासाठी कोणती लाजिरवाणी गोष्ट नसेल ! नेतेमंडळींनी याचा विचार करून आपापसांतील भांडणे अल्प करून देशाच्या प्रगतीचा विचार करायला हवा !

नवाब मलिक यांची पाठराखण केल्यामुळे भाषण अर्ध्यावर सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचा सभात्याग !

विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न दिल्याने भाजपच्या आमदारांनी २५ मार्च या दिवशी सभात्याग केला.