‘सामान्य परिस्थितीत नेतेमंडळी भांडतात’, असे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वक्तव्य करणे, यांसारखी देशासाठी कोणती लाजिरवाणी गोष्ट नसेल ! नेतेमंडळींनी याचा विचार करून आपापसांतील भांडणे अल्प करून देशाच्या प्रगतीचा विचार करायला हवा ! – संपादक
लोणावळा – भारतात सामान्य परिस्थितीमध्ये गल्लीतही भांडणे होतात. नेतेमंडळीही पुष्कळ भांडतात; मात्र संकट येताच सर्व एकत्र येतात, असे निरीक्षण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नोंदवले. लोणावळा येथे ‘स्वच्छतादूत’ आणि कोरोना योद्ध्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार दिला. त्या वेळी ते बोलत होते.
महालक्ष्मी महिला मंच लोणावळा या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित स्वच्छ सर्व्हेक्षण- स्वच्छतादूत आणि कोरोना योद्धा-आरोग्यदूत पुरस्कार वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत लोणावळा येथे संपन्न झाले. pic.twitter.com/6iFjcbnker
— Governor of Maharashtra (@maha_governor) March 27, 2022
#TheKashmirFiles : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले…#Maharashtra #bhagatsinghkoshyari https://t.co/QO1NjDLiQt
— ABP माझा (@abpmajhatv) March 27, 2022
कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण देशात सर्वांनी एकत्र येत काम केले. यापुढे जाऊन संकट येऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. तसेच सर्वांनी नेहमी एकत्र रहाण्यासाठी प्रयत्न करायला हवा. असे झाले तर लोणावळा एक आदर्श निर्माण करेल, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.