मध्यप्रदेशात काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा आदेश

काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांचा आदेशाला विरोध

  • काँग्रेसने आतापर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचे लांगूलचालन केले. काँग्रेसला आता कळून चुकले आहे की, इफ्तारच्या मेजवान्या करून पुन्हा सत्ता मिळवता येणार नसल्याने आता हिंदूंना खूश करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; मात्र हिंदूंना ‘काँग्रेसची ही ढोंगबाजी आहे’, हे ठाऊक आहे ! – संपादक
  • काँग्रेसमधील हिंदु कार्यकर्त्यांनी मुसलमानांचे सण साजरे करणे स्वीकारले होते; मात्र आता मुसलमान आमदाराला पक्षाकडून हिंदूंचा सण साजरा करणे स्वीकारले जात नाही, हे काँग्रेसच्या हिंदु कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक
  • आमदार आरिफ मसूद यांनी असा विरोध कधी काँग्रेसला इफ्तार पार्टी साजरा करण्याच्या वेळी केला आहे का ? तरीही काँग्रेसला आरिफ मसूद धर्मनिरपेक्ष वृत्तीचे वाटतात का  ? – संपादक
डावीकडे काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा लेखी आदेश दिला. यावर काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी आक्षेप घेत ‘अशा आदेशामुळे चुकीचा प्रघात पडेल’, असे म्हटले आहे.

१. मसूद पुढे म्हणाले की, अशा प्रकारचा लेखी आदेश राजकीय पक्षांनी देणे अयोग्य आहे. आपण ज्या विचारसरणीसाठी काम करतो, त्यांत सर्वांना समवेत घेऊन पुढे जायचे असते. अशा वेळी तुम्ही केवळ श्रीरामनवमी आणि हनुमान चालिसा यांचाच उल्लेख केला; मात्र आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे आणि रमजान यांचा उल्लेख करण्यात आला नाही. हे तिनही मोठे उत्सव आहेत. अन्य आणि आपण यांत भेद आहे. अन्य पक्ष एकाच धर्माविषयी बोलतात, तर आपण सर्व धर्मांविषयी बोलतो. अशा वेळी आपण केवळ राजकीय गोष्टींविषयीच बोलले पाहिजे. धार्मिक सण होत आहेत आणि होत रहातील, ते कुणीही थांबवू शकत नाहीत.

२. राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी मसूद यांच्यावर टीका करतांना म्हटले की, ‘एकेकाळी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करणारा पक्ष आता मंदिराच्या चकरा का मारू लागला आहे ?’, हे मसूद पचवू शकलेले नाहीत.