आमदार हरिभाऊ बागडे, अशोक चव्‍हाण अन् प्रशांत बंब यांना मराठा तरुणांनी विचारला जाब !

मराठा आरक्षणाच्‍या सूत्रावरून राज्‍यात मराठा समाजातील तरुण हे राजकीय नेत्‍यांना जाब विचारू लागले आहेत. केवळ सत्ताधारीच नाही, तर विरोधक आमदारही यातून सुटले नाहीत.

ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यांसह साथीच्या आजारांमुळे नागरिक त्रस्त !

यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र प्रमाण वाढतच आहे. आरोग्य विभागाने डासांची उत्पत्ती होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे, तसेच हलगर्जीपणा न करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात ‘एंटेरो कॉक्ससॅकी’ विषाणूमुळे ५ लाखांहून अधिक लोक डोळ्यांच्या साथीने ग्रस्त !

राज्यात डोळ्यांची साथ ‘एंटेरो फॅमिलीतील कॉक्ससॅकी’ या विषाणूमुळे आली आहे. वातावरणातील आर्द्रतेमुळे झपाट्याने डोळ्यांच्या साथीचा संसर्ग होऊन रुग्णसंख्या ५ लाखांहून अधिक झाली आहे. ‘कॉक्ससॅकी’ विषाणू धोकादायक नसला, तरी काळजी घेणे आवश्यक आहे.

रुग्‍णालयात आवश्‍यक सुविधांची वानवा; खराब शवपेट्यांमुळे मृतदेह उघड्यावर !

भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्‍णालयात अनागोंदी कारभार चालू आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांनी रुग्‍णालयाच्‍या व्‍यवस्‍थेचा आढावा घेण्‍यासाठी २८ ऑगस्‍टला ठाणे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक कैलास पवार यांना बोलावले होते.

रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी चालकाची नियुक्ती करा !

कायमस्वरूपी चालकासाठी मागणी का करावी लागते ? चालक नसेल, तर रुग्णवाहिकेचा रुग्णांना काय लाभ होणार ?

भर वर्गात विद्यार्थिनींना श्वसनाचा त्रास : डिचोली (गोवा) येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील घटना

पोलिसांचे विद्यालयाच्या व्यवस्थापनाला पत्र : संशयित अल्पवयीन असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, विद्यालयाच्या व्यवस्थापनाने कठोर कारवाई करावी !

कळवा (ठाणे) रुग्णालयात आणखी ४ रुग्णांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज रुग्‍णालयात १० ऑगस्‍टच्‍या रात्री ६ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडल्‍यावर राजकीय वातावरण तापले असतांनाच मागील २४ घंट्यांत १८ जणांचा मृत्‍यू झाला, तर १४ ऑगस्‍टला आणखी ४ रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती रुग्‍णालय प्रशासनाने दिली आहे.

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा !

शाळेतील मुलांची डोळ्यांची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.

‘ई संजिवनी टेलिकन्सलटेशन’ योजनाद्वारे अतीदुर्गम भागातील रुग्णांना सेवा दिली जात आहे ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

अतीदुर्गम भागांमध्ये रुग्णांना ‘टेलिमेडिसन’च्या माध्यमातून सेवा दिली जात होती. त्यानंतर केंद्र सरकारने आयुष्यमान योजनेअंतर्गत ‘ई संजिवनी टेलिकन्सलटेशन’ योजना आणली. त्यानुसार अतीदुर्गम किंवा दूरच्या भागांमध्ये रुग्णांना सेवा दिली जात आहे.

सर्पदंशावरील संपूर्ण उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करावेत !

रुग्णाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सिद्ध झाले, तरच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून साहाय्य मिळते, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी असे निर्देश दिले.