मुंबईत बोगस मुसलमान आधुनिक वैद्याला अटक !

मुंबई – वैद्यकीय क्षेत्रातील पदवीचे शिक्षण न घेता केवळ इयत्ता १२ वीपर्यंत शिकून गोवंडी येथे स्वत:चा दवाखाना उघडून रुग्णांवर उपचार करणारा अल्ताफ हुसेन महंमद निजाम खान याला पोलिसांनी अटक केली. मागील ५ वर्षांपासून तो गोवंडी येथे रुग्णांवर उपचार करत होता. ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’मध्ये नोंदणी नसतांना अल्ताफ खान रुग्णांवर उपचार करत होता. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साहाय्याने बोगस रुग्ण पाठवून पोलिसांनी अल्ताफ खान याच्यावर कारवाई करून त्याच्याकडील वैद्यकीय उपकरणे कह्यात घेतली. त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

५ वर्षांत हा आधुनिक वैद्य बोगस असल्याचे कुणाच्याच लक्षात कसे आले नाही ?