GMC Goa India’s First Government Hospital With Robotic Surgery : गोमेकॉ’च्या रुग्णालयात ‘रोबोटिक सर्जरी विभाग’ चालू होणार ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (गोमेकॉचे) रुग्णालय अत्याधुनिक सुविधा असलेले देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरणार !

गोमेकॉ : अत्याधुनिक सुविधा असलेले देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरणार !

पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉत) लवकरच ‘मिनिमल इन्वेझीव्ह अँड रोबोटिक’ विभाग चालू केला जाणार आहे. यामुळे महाविद्यालयात ‘लेपरोस्कोपिक सर्जरी’ करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. हे तंत्रज्ञान २६ जानेवारी २०२४ या दिवशी जनतेसाठी खुले होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले,

‘‘रोबोटिक सर्जरी विभाग’ असलेले गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय देशातील पहिले अत्याधुनिक सुविधा असलेले सरकारी रुग्णालय ठरणार आहे. ‘लेपरोस्कोपिक सर्जरी’ करण्याचे तंत्रज्ञान रुग्णांना विनामूल्य उपलब्ध होणार आहे. अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या आणि शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक लाभ होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे रुग्णांचा रांगेत रहाण्याचा वेळ अल्प होणार आहे. आरोग्य क्षेत्रात गोवा राज्य इतरांना प्रेरणा देणारे आदर्श राज्य ठरणार आहे.’’