गंभीर स्‍थितीतील रुग्‍णासाठी ‘हृदय-श्‍वसन पुनरुज्‍जीवन तंत्र’ एक संजीवनी !

  • साहाय्‍यासाठी संपर्क करा.
  • व्‍यक्‍तीला तिच्‍या पाठीवर झोपवा आणि तिचा श्‍वसनमार्ग मोकळा असल्‍याचे तपासा.
  • रुग्‍णाचा श्‍वासोच्‍छ्‍वास चालू आहे का ? हे तपासा.
  • छातीदाबन करा.
  • रुग्‍णाला श्‍वास द्या.
  • रुग्‍णवाहिका येईपर्यंत या
  • कृती पुनःपुन्‍हा करत रहा.

गंभीर स्‍थितीतील रुग्‍ण म्‍हणजे कोणत्‍याही कारणाने हृदयक्रिया-श्‍वसनक्रिया बंद पडलेला, बेशुद्ध, अत्‍यवस्‍थ किंवा प्रतिसाद न देणारा रुग्‍ण. अशा रुग्‍णाला ‘मूलभूत जीवितरक्षण साहाय्‍य’ करतांना प्रथमोपचारकाने AB-CABS या पद्धतीचा वापर करणे उपयुक्‍त ठरते. या पद्धतीला ‘हृदय-श्‍वसन पुनरुज्‍जीवन तंत्र’ असे म्‍हणतात, जी एक संजीवनी आहे. इंग्रजी आद्याक्षरांनी निर्माण झालेला AB-CABS हा शब्‍द (पद्धत) मूलभूत जीवितरक्षण साहाय्‍याविषयी प्रथमोपचारातील महत्त्वाचे टप्‍पे योग्‍य त्‍या क्रमाने लक्षात ठेवण्‍यास प्रथमोपचारकाला साहाय्‍य करतो. AB-CABS या शब्‍दातील इंग्रजी आद्याक्षरांचे संक्षिप्‍त विवरण पुढीलप्रमाणे आहे.

A – Airway ? : रुग्‍णाचा श्‍वसनमार्ग मोकळा आहे का ?

B – Breathing ? : रुग्‍णाचा श्‍वासोच्‍छ्‍वास चालू आहे का ?

C – Chest Compressions : छातीदाबन करा.

A – Opening the Airway : श्‍वसनमार्ग मोकळा करा.

B – Breathing for the patient (30:2) : रुग्‍णाचे छातीदाबन ३० वेळा केल्‍यानंतर त्‍याला २ वेळा तोंडातून तोंडात श्‍वसन द्या. रुग्‍णाचा श्‍वासोच्‍छ्‍वास चालू असल्‍यास (अथवा वरील उपचारांनंतर रुग्‍णाचा श्‍वासोच्‍छ्‍वास नीट आणि आपोआप होऊ लागल्‍यानंतर) पुढील गोष्‍टी क्रमाने लगेच पडताळा.

S – check for Serious Bleeding : गंभीर रक्‍तस्राव होत आहे का ?

Shock : मर्माघात झाला आहे का ?