‘हिल टॉप’, वागातोर येथे चालू असलेल्या छोट्या स्वरूपातील ‘सनबर्न’मध्ये कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन

गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

हरिद्वार : धर्मसंसदेत वक्त्यांच्या कथित आक्षेपार्ह विधानांवरून सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ अधिवक्त्यांचे सरन्यायाधिशांना पत्र

हिंदूंवरील अत्याचारांविषयी, तसेच त्यांच्यावर होणार्‍या आक्रमणांविषयी अशा प्रकारचे पत्र लिहिण्याची सुबुद्धी या अधिवक्त्यांना कधी का होत नाही ? कि कायदा आणि सुव्यवस्था केवळ अन्य धर्मियांसाठीच असतात? असे त्यांना वाटते ?

केंद्र सरकारच्या आदेशानंतर यू ट्यूबवरून प्रसारित होणार्‍या भारतविरोधी २० वाहिन्या आणि २ संकेतस्थळे यांच्यावर बंदी !

‘गूगल’ची मालकी असलेल्या यूट्यूबने भारतविरोधी विचार पसरवणार्‍या २० वाहिन्यांवर बंदी घातली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.

मुसलमानबहुल लक्षद्वीपमध्ये शाळांना आता शुक्रवार ऐवजी रविवारी सुट्टी असणार ! – प्रशासनाचा निर्णय

मुळात शुक्रवारची सुट्टी असणे हाच निर्णय चुकीचा होता. जर तो आता सुधारला जात आहे आणि त्याला विरोध करण्यात येत असेल, तर विरोधकांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

साम्यवाद्यांचे सरकार असलेल्या केरळ राज्यात धर्मांधांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली न जाणे, यात आश्‍चर्य ते काय ?

देहलीतील दंगलीपूर्वी भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण विधानांची चौकशी करण्याच्या मागणीवर लवकर निर्णय घ्या !

देहलीमध्ये गेल्यावर्षी झालेल्या दंगलीच्या पूर्वी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या द्वेष पसरवणार्‍या विधानांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांची चौकशी करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने देहली उच्च न्यायालयाला आदेश देत यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे.

जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्यावर पैगंबर आणि कुराण यांच्याविषयी बोलण्यास बंदी घालावी ! – अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

भारतात इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे येतात; मात्र त्यांपैकी कुणीही या प्रकरणी पुढे येऊन अशा याचिकांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘भारतात रा.स्व. संघाची ब्राह्मण्यवादी विचारसरणी अल्पसंख्यांकांना बाजूला लोटत आहे !’

पाकने तेथील अल्पसंख्यांकांचा विशेषतः हिंदूंचा जो वंशसंहार गेली ७४ वर्षे होत आहे, त्यांचे रक्षण करण्याकडे लक्ष द्यावे ! जिहादी आतंकवादी, जिहादी विचारसरणी आणि प्रत्यक्ष कृती, हे तेथील अल्पसंख्यांकांना ठार मारत आहे, याविषयी इम्रान खान गप्प का ?

ब्रिटनमध्ये शाळेने वर्गांत नमाजपठण करण्याची अनुमती न दिल्याने विद्यार्थ्यांचे थंडीत मैदानात नमाजपठण !

कुठे स्वतःच्या धर्माचे कुठेही असले, तरी पालन करणारे मुसलमान विद्यार्थी, तर कुठे कॉन्व्हेंटमध्ये बांगड्या, कुंकू काढून टाकण्यास सांगितल्यावर आणि येशूची प्रार्थना करण्यास सांगितल्यावर त्यानुसार वागणारे भारतातील हिंदू !

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे !’ – एम्.आय.एम्.

जो खर्‍या अर्थाने या देशाच्या भूमीवर प्रेम करतो आणि तिला आपले मानतो, तो कधीही ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार नाही; मात्र जे विरोध करत आहेत, त्यांनी कितीही ते या भूमीवर प्रेम करत असल्याचे दाखवले, तरी ती ढोंगबाजीच आहे, हे लक्षात घ्या !