बांगलादेशातील हिंदूंना पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे आवाहन
झाशी (उत्तरप्रदेश) – जर बांगलादेशातील हिंदू भ्याड असतील, तर ते त्यांची (या परिस्थितीतून) सुटका करून घेऊ शकणार नाहीत. जर तुमच्या (वृत्तवाहिन्या) माध्यमातून आमचा संदेश बांगलादेशातील हिंदूंपर्यंत पोचला, तर ज्याप्रमाणे येथे पदयात्रा चालू आहे, तशाच प्रकारे तुम्हीही रस्त्यावर उतरा. संघटित होऊन तुमच्या संस्कृतीचे रक्षण करणार्या रक्षकाला (चिन्मय प्रभु यांना) वाचवा. त्यांना बाहेर काढा. अन्यथा एकेक करून तुमच्या मंदिरांचे मशिदींमध्ये रूपांतर होईल. तुमच्या बहिणी आणि मुली एकतर धर्मांतरित होतील किंवा मारल्या जातील. भारतातील हिंदूंनही ते लक्षात घेतले पाहिजे, असे आवाहन मध्यप्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे केले. बागेश्वर ते ओरछा अशी त्यांनी सनातन हिंदु जागृती पदयात्रा चालू आहे. ही पदयात्रा झाशी येथे पोचल्यावर ते बोलत होते.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केलेले मार्गदर्शन
आम्ही बांगलादेशातील हिंदूंच्या समवेत आहोत !
आम्ही रात्रंदिवस जीव धोक्यात घालून जगत आहोत. १०० कोटी हिंदूंच्या चिंतेमुळेच आम्ही गावांमध्ये आणि रस्त्यांवर बसून मागास आणि वंचित यांच्याशी चर्चा करत आहोत. आम्ही बांगलादेशातील हिंदूंच्या समवेत आहोत. आम्ही तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही रस्त्यावर उतरा. अन्यथा भविष्यात कुणीही हिंदूंसाठी आवाज उठवणार नाही.
धर्मांध जेथे अधिक असतात, तेथे हिंसाचार करतात !
भारतातील कितीतरी राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. जेथे त्यांची (धर्मांधांची) संख्या अधिक असते, तेथे असे घडते. आपल्या आजूबाजूलाही हे लोक आहेत; पण ते येथे असे करत नाहीत. जेथे ते संख्येने अधिक आहेत, तेथे आक्रमण करतात. ते (धर्मांध मुसलमान) त्यांच्या लोकसंख्येनुसार नियोजन करतात आणि आक्रमणाचे पूर्वनियोजन करतात, हेच यातून सिद्ध होते. दगडफेक, जाळपोळ, पेट्रोल बाँब फेकणार्यांपासून सर्वांना तेथे बाहेरून बोलावले जाते, असा आरोपही पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केला.
१ कोटी कट्टर हिंदू मिळाले, तर सहस्रो वर्षे कुणी सनातनवर बोट दाखवू शकणार नाही !
आज (२६ नोव्हेंबर) ‘संविधान दिन’ही आहे. मुंबईवर वर्ष २००८ मध्ये आजच्याच दिवशी आतंकवादी आक्रमण झाले होते. जर मला १०० कोटी हिंदूंपैकी १ कोटी कट्टर हिंदू मिळाले, तर सहस्रो वर्षे कुणीही सनातनवर बोट दाखवू शकणार नाही.
भारत बांगलादेश होण्याच्या मार्गावर ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह
पदयात्रेत सहभागी झालेले केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, ‘भारत बांगलादेश होण्याच्या मार्गावर आहे’, या विचाराने आमचे मन खूप घाबरले आहे. कायदा हातात घेऊन राज्यघटनेची थट्टा केली जात आहे. उद्या ते कुणाचेही ऐकणार नाहीत. देशाची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल; मग हिंदूंना कोण वाचवणार ? त्यामुळे आपण आपली शक्ती कायम ठेवूया. ‘तुमची संस्कृती वाचवण्यासाठी जोरदार आवाज उठवा’, हे हिंदूंच्या मनावर ठसवण्यासाठी पदयात्रेची आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशच नाही, तर भारतातही हेच आवाहन असले पाहिजे ! आता भारतासह जगातील सर्वच हिंदूंनी ‘एक है तो सेफ है’ (संघटित असलो, तर सुरक्षित राहू) याचा विचार करून संघटित झाले पाहिजे. मुसलमान जगात कुठेही धार्मिक आघात झाले, तर ते संघटित होतात, तसेच हिंदूंनी होणे आता आवश्यक झाले आहे ! |