कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनची राजधानी कीववर ड्रोनद्वारे आक्रमण केले आहे. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी नुकतीच टेलिग्राम वाहिनीवर याविषयी माहिती दिली. कीवच्या महापौरांनी सांगितले की, ड्रोन (मानवरहित हवाई यंत्रे) वापरून राजधानी कीववर आक्रमण चालूच आहे. युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीने हवेत अनेक ड्रोन नष्ट केले आहेत. या आक्रमणात २३ जण घायाळ झाले आहेत.
यापूर्वी रशियाने खार्किवमध्ये केलेल्या ड्रोनच्या आक्रमणात १० जण घायाळ झाले होते. युक्रेनने अलीकडेच रशियावर लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी आक्रमण केले होते. युक्रेनने मारा केलेली ‘बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे’ नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे.