India On Chinmoy Das Arrest : बांगलादेशाने हिंदूंचे रक्षण करावे !

भारताची विनंती !

बांगलादेशातील ‘सनातन जागरण ज्‍योत’चे नेते चिन्‍मय कृष्‍ण दास प्रभु

नवी देहली – बांगलादेशातील ‘सनातन जागरण ज्‍योत’चे नेते चिन्‍मय कृष्‍ण दास प्रभु यांना अटक आणि जामीन नाकारल्‍याविषयी आम्‍ही अत्‍यंत चिंतित आहोत. बांगलादेशातील कट्टरतावादी घटकांनी हिंदू आणि इतर अल्‍पसंख्‍यांक यांच्‍यावर केलेल्‍या आक्रमणांच्‍या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडली आहे. अल्‍पसंख्‍यांकांची घरे आणि दुकाने लुटली गेली आहेत. यासह त्‍यांच्‍या मंदिरांत चोरी, तोडफोड आणि अपवित्रता यांची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या घटनांचे गुन्‍हेगार अजूनही मुक्‍तपणे फिरत असतांना शांततापूर्ण मेळाव्‍यांद्वारे मागण्‍या मांडणार्‍या एका धार्मिक नेत्‍यावर आरोप केले जात आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे. चिन्‍मय प्रभु यांच्‍या अटकेविरोधात शांततेत आंदोलन करणार्‍या अल्‍पसंख्‍यांकांवर होत असलेल्‍या आक्रमणांविषयीही आम्‍ही चिंतित आहोत. आम्‍ही बांगलादेशाच्‍या अधिकार्‍यांना हिंदूंचे आणि त्‍यांच्‍या अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्याचे रक्षण करण्‍याची विनंती करतो, असे भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने बांगलादेशाला दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

भारत अण्‍वस्‍त्रधारी देश असून भारतानेच बांगलादेशाची निर्मिती केली आहे. त्‍यामुळे भारताने विनंती न करता बांगलादेशाला हिंदूंचे रक्षण करण्‍याची विनंती नव्‍हे, तर कठोर आदेश देणे आवश्‍यक आहे. जर बांगलादेश ते करत नसेल, तर भारताने बांगलादेशात सैन्‍य घुसवले पाहिजे. यातून जगभरातील हिंदूंना ‘एक है तो सेफ है’ अशी निश्‍चिती होऊ शकतील !