(म्हणे) ‘भारतीय अधिकार्‍यांच्या विधानांमुळे सीमेवर तणाव वाढू शकतो !’ – चीनचा थयथयाट

सीडीएस् जनरल बिपिन रावत यांनी काही चुकीचे सांगितलेले नाही; मात्र चीनला मिरच्या झोंबल्यामुळे तो थयथयाट करत आहे. यापेक्षा चीनने सीमेवरील कुरापती बंद कराव्यात आणि अक्साई चीन भारताला परत द्यावा !

अ‍ॅमेझॉनवर कठोर कारवाई करा ! – ‘कॅट’ची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही कि गांजा अन् बाँब बनवण्याचे साहित्य विकण्याला त्यांची अनुमती आहे ?

भारतीय खेळाडूंना केवळ ‘हलाल’ मांस देण्याची कोणतीही योजना नाही ! – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या आधी भारतीय संघातील खेळाडूंच्या आहारामध्ये ‘हलाल’ मांसाचाच वापर करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याच्या निर्णयाला पुरोहितांकडून पुन्हा विरोध चालू

उत्तराखंडमधील चारधाम समवेत ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्यास मंदिरांच्या पुजार्‍यांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. यापूर्वी भाजप सरकारने ‘याविषयीचे देवस्थानम् बोर्ड रहित करण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले होते

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेकडून साखरवाटप !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना होणारा विरोध ही मोठी विकृती ! अशांवर सरकारने स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित आहे !

कुडाळ येथे ‘पद्मश्री’ कंगणा राणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसकडून निषेध

जहाल क्रांतीकारकांचा काँग्रेसवाल्यांनी आतंकवादी असा उल्लेख केला. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वा. सावरकर यांच्याविषयी वाटेल ते बरळणार्‍या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या विरोधात बोलल्यावर पोटशूळ का उठतो ?

उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांच्या महंमद पैगंबर यांच्या चरित्रावरील पुस्तकाचे महंत यति नरसिंहानद यांच्या हस्ते प्रकाशन

या पुस्तकातून इस्लामी कट्टरतावादी विचारसरणी समजावण्यात आली आहे. इस्लाम कशा प्रकारे पसरला ? त्याचा उद्देश काय आहे ?, हे सर्व या पुस्तकातून लक्षात येईल.

इस्रायलच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत फाडला इस्रायलविरोधी अहवाल !

अनेकदा जागतिक व्यासपिठावर भारतविरोधी अहवाल सादर केले जातात, तेव्हा भारताने आजपर्यंत कधी अशी कठोर भूमिका घेतली आहे का ?

त्रिपुरामध्ये जमावाकडून मशीद, घरे आणि दुकाने यांची तोडफोड आणि जाळपोळ

उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली, तसेच २ दुकाने पेटवून देण्यात आली.

उत्तरप्रदेशातील ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव ‘अयोध्या कँट’ होणार

ज्या प्रमाणात उत्तरप्रदेश सरकार राज्यातील मोगलकालीन नावे पालटत आहे, त्या प्रमाणात अन्य कुठल्याही राज्यात असे होतांना दिसत नाही. केंद्र सरकारने आता  देशभरातील मोगल आणि ब्रिटीश कालीन नावे पालटण्याचा निर्णय घेतला पाहिजे !