देहलीतील दंगलीपूर्वी भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण विधानांची चौकशी करण्याच्या मागणीवर लवकर निर्णय घ्या !

सर्वोच्च न्यायालयाचा देहली उच्च न्यायालयाला आदेश

नवी देहली – देहलीमध्ये गेल्यावर्षी झालेल्या दंगलीच्या पूर्वी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या द्वेष पसरवणार्‍या विधानांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांची चौकशी करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने देहली उच्च न्यायालयाला आदेश देत यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे. ‘हा निर्णय येत्या ३ मासांत घेण्यात यावा’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.