दोन्ही देशांत चर्चा होईपर्यंत चीनने त्याची गुप्तहेर नौका श्रीलंकेत पाठवू नये !

सध्या ही नौका तैवानजवळील समुद्रात आहे. या नौकेवर अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ही नौका श्रीलंकेत पोचली, तर ती तेथून भारतातील काही ठिकाणांची टेहाळणी करून संवेदनशील माहिती गोळा करू शकते.

पुढील सुनावणीपर्यंत ‘आरे’ वसाहतीतील एकही झाड तोडू नका !

‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने अडचण ठरणार्‍या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली होती. छाटणीच्या नावाखाली आरेमध्ये अवैधरित्या झाडे तोडल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

(म्हणे) ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात संघ ब्रिटिशांच्या बाजूने राहिला !’

तत्कालीन काँग्रेसचे धोरण पहाता सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, यांसारखे काही नेते वगळता नेहरू आणि त्यांचे पाठीराखे काँग्रेसवाले ब्रिटिशांचे हस्तक असल्यासारखेच वागत होते. रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची ‘राष्ट्राभिमानी’ हीच ओळख आहे.

हिंदूंच्या विरोधानंतर ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचे नाव ‘सत्यप्रेम की कथा’ असे केले !

हिंदूंच्या संघटितपणाचा विजय ! हिंदू आता जागृत होऊन देवतांच्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवू लागले आहेत, हे अभिनंदनीय आहे. अशा प्रकारे सर्वत्रचे हिंदू जागृत झाल्यास कुणीही हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान करू धजावणार नाही !

कोरोनाचे लसीकरण अभियान संपल्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

कोरोना लसीकरण अभियान संपल्यानंतर लगेचच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

काश्मीरविषयी पाककडून करण्यात येणारा प्रचार मोडून काढावा !

पाकिस्तान हा काश्मीरमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे. खोर्‍यातील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी तो इस्लामी खिलाफतची कल्पना पसरवत आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जुन्या ठरावांचा वापर केला जात आहे.

राज्यघटना धर्मविरोधी आहे का ?

हिंदु धर्मावर टीका करणे, म्हणजे त्यांना पुरोगामित्व वाटते. पुरोगामी मंडळी राज्यघटनेचा सोयीनुसार उपयोग करून हिंदु धर्माला विरोध करत असतील, तर हिंदूंनीही विश्वकल्याण साधेल, असे राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

इराकमध्ये संसदेत घुसून सहस्रो आंदोलकांचा गोंधळ

इराकमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून इराण समर्थक व्यक्तीचे नाव घोषित केल्याच्या विरोधात आंदोलन चालू झाले आहे. सहस्रो आंदोलकांनी २७ जुलैच्या रात्री इराकच्या संसदेत घुसून इराकी झेंडे फडकवत गोंधळ घातला.

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदल यांचा शिरच्छेद करण्याची धमकी !

हिंदुत्वनिष्ठांना धमकी मिळाल्यावर पोलीस संबंधितांना संरक्षण पुरवतात. असे संरक्षण पुरवण्यासह धमकी देणार्‍यांवर वचक बसेल, अशी कारवाई केल्यास हिंदूंना धमकावण्याचेच काय, तर त्यांच्याकडे डोळे वर करून बघण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही !

घराघरांवर तिरंगा फडकावण्यावर मेहबूबा मुफ्ती यांचा आक्षेप !

अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे !