हिंदूंच्या विरोधानंतर ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचे नाव ‘सत्यप्रेम की कथा’ असे केले !

देहली – हिंदूंच्या विरोधानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवानी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचे नाव पालटून ‘सत्यप्रेम की कथा’, असे करण्यात आले आहे. साजिद नाडियावाला निर्माता असलेल्या चित्रपटाचे प्रारंभी ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने ‘पोस्टर’ प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर अनेक हिंदु संघटनांनी याला तीव्र विरोध केला. यानंतर लगेचच दिग्दर्शक असलेल्या समीर विद्ध्वंस यांनी  ‘चित्रपटाच्या या नावामुळे लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. पूर्वीचे नाव आम्ही पुष्कळ विचारपूर्वक दिले होते; मात्र आम्ही आता नाव पालटत आहोत’, असे सांगितले.

सौजन्य जनसत्ता

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या संघटितपणाचा विजय ! हिंदू आता जागृत होऊन देवतांच्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवू लागले आहेत, हे अभिनंदनीय आहे. अशा प्रकारे सर्वत्रचे हिंदू जागृत झाल्यास कुणीही हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान करू धजावणार नाही !