सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदल यांचा शिरच्छेद करण्याची धमकी !

अजमेर दर्ग्याचा सेवेकरी (खादिम) आदिल चिश्ती याच्या विरोधात केली होती तक्रार !

अधिवक्ता विनीत जिंदल

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विनीत जिंदल यांना अज्ञाताने पत्र पाठवून शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. जिंदल यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी धमकीचे अन्वेषण चालू केले आहे. जिंदल यांनी ट्वीट करून माहिती दिली की, प्रथम देशातील आणि नंतर विदेशी संपर्क क्रमांकावरूनही धमकीचे दूरभाष आले. जिंदल यांनी काही दिवसांपूर्वी अजमेर दर्ग्याचे सेवेकरी खादिम आदिल चिश्ती याच्या विरोधात देहली पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळेच त्यांना धमकी मिळाल्याचे सांगितले जात आहे. जिंदल यांना यापूर्वीच पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. (हिंदुत्वनिष्ठांना धमकी मिळाल्यावर पोलीस संबंधितांना संरक्षण पुरवतात. असे संरक्षण पुरवण्यासह धमकी देणार्‍यांवर वचक बसेल, अशी कारवाई केल्यास हिंदूंना धमकावण्याचेच काय, तर त्यांच्याकडे डोळे वर करून बघण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही ! – संपादक)