(म्हणे) ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात संघ ब्रिटिशांच्या बाजूने राहिला !’

‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांची रा.स्व. संघावर टीका

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढला आहे; मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटिशांना सहकार्य केले, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. (संघाने स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटिशांना सहकार्य केल्याचा एकतरी पुरावा चोडणकर यांच्याकडे आहे का ? दुसर्‍यावर टीका करून स्वतः मोठे होता येत नाही ! – संपादक)

(सौजन्य : Goanvarta Live) 

गिरीश चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘भारतीय तिरंग्याला काँग्रेसच्या नेत्यांच्या बलीदानाचे रक्त लागलेले आहे. (बलीदान दिले ते उधमसिंह, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, राजगुरु यांसारख्या जहाल क्रांतीकारकांनी ! किती काँग्रेसवाले फासावर चढले ? – संपादक) संघाने तिरंग्याला योग्य सन्मान आणि महत्त्व देण्यास नकार दिलेला आहे. संघाने तिरंगा त्यांच्या नागपूर येथील मुख्यालयावर कित्येक वर्षे फडकावला नव्हता; मात्र मुख्यालयावर वर्ष १९९१ ते २००१ या कालावधीत तिरंगा फडकावण्यात आला. केंद्राच्या‘हर घर तिरंगा’ ही मोहीम चांगली आहे. संघ आणि भाजप यांना अखेर तिरंग्याचे महत्त्व लक्षात आले आहे.’’

संपादकीय भूमिका

  • तत्कालीन काँग्रेसचे धोरण पहाता सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, यांसारखे काही नेते वगळता नेहरू आणि त्यांचे पाठीराखे काँग्रेसवाले ब्रिटिशांचे हस्तक असल्यासारखेच वागत होते.
  • रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची ‘राष्ट्राभिमानी’ हीच ओळख आहे.