पाकिस्तानी गुप्तहेराला देहलीत अटक

पाकिस्तान भारताच्या विरोधात कोणकोणत्या क्लुप्त्या लढवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. अशा पाकला समूळ नष्ट केल्यासच सर्व समस्या सुटू शकतील, हे सरकारने जाणावे !

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाच्या प्रदर्शनास ‘नेटफ्लिक्स’चा नकार !

राष्ट्र आणि धर्म यांना विरोध केल्यावर पदरी काय पडते, याचा चांगलाच धडा अभिनेते आमीर खान यांना मिळाला आहे ! अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांनी यांतून बोध घ्यावा !

विद्वेषाचे मूळ नष्ट करा !

भारताच्या विरोधात एकाने गरळओक केली, तरी कोट्यवधींनी संघटित होऊन तो आवाज दडपला पाहिजे. जेव्हा हे साध्य होईल, तेव्हा कुणीही भारतविरोधी पाऊल उचलतांना १०० वेळा विचार करील. यासाठी नागरिक आणि सरकार दोघांनीही राष्ट्रकर्तव्याचे भान ठेवून कृतीशील व्हावे !

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाविषयी चालू असलेली बहिष्काराची मोहीम योग्य ! – मुकेश खन्ना, अभिनेते

अभिनेते मुकेश खन्ना यांच्या या भूमिकेविषयी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री काही बोलतील का ?

‘राष्ट्राभिमान’ महत्त्वाचा कि अभिव्यक्तीस्वातंत्र्य ?

धर्मांध मुसलमान ‘वन्दे मातरम्’ न म्हणता राष्ट्रवादाला फाटा देणार असतील आणि राजकारणी त्याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांनाही ‘असे नेते अन् राजकीय पक्ष यांना निवडून आणायचे का ?’, हा विचार करावा लागेल.

हेरगिरी करणारी चीनची नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोचली !

भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेने अनुमती दिल्यानंतर चीनची ‘युआन वांग-५’ ही हेरगिरी करणारी नौका १६ ऑगस्टला सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोचली. ही नौका २२ ऑगस्टपर्यंत तेथे असेल. ही हेरगिरी नौका जवळपास ७५० किलोमीटर अंतरावरील टेहळणी करू शकते.

सलमान रश्दी यांच्यावरील आक्रमणात आमचा हात नाही ! – इराण

न्यूयॉर्क येथे १२ ऑगस्टला एका कार्यक्रमात भारतीय वंशाचे मूळचे अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणात आमचा हात नाही, असा खुलासा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.

पाकिस्तानमध्ये एका विश्‍वविद्यालयातील स्पर्धेमध्ये फडकावण्यात आला भारताचा राष्ट्रीय ध्वज !

या विश्‍वविद्यालयातील एका स्पर्धेमध्ये शहरातील शहिदा इस्लाम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून हा झेंडा फडकावण्यात आला; मात्र लगेच त्याला रोखण्यात आले. हे विद्यार्थी एकेका देशाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यात भारताचाही समावेश होता.

योगी देवनाथ यांना धर्मांधाकडून शिरच्छेद करण्याची धमकी

गुजरातमधील हिंदु युवा वाहिनीचे माजी प्रदेशाध्यक्ष योगी देवनाथ यांना सामाजिक माध्यमांद्वारे ठार मारण्याची ‘सलीम अली’ या ट्विटर खात्यावरून  देण्यात आली.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील पाकिस्तानी आतंकवाद्यावरील निर्बंधाच्या प्रस्तावाला चीनचा विरोध

चीन स्वतः उघूर मुसलमानांवर अत्याचार करत आहे,  तर अन्य देशांतील जिहादी आतंकवाद्यांचा बचाव करत आहे, हा चीनचा दुटप्पीपणा आहे !