घराघरांवर तिरंगा फडकावण्यावर मेहबूबा मुफ्ती यांचा आक्षेप !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आजादी का अमृत महोत्सव’ या मोहिमेच्या अंतर्गत सर्व नागरिकांना १२ ते १५ ऑगस्टपर्यंत स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत देशातील २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, असा अंदाज आहे; मात्र जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावरही टीका केली आहे. ‘माजी राष्ट्रपती यांनी एक असा वारसा मागे सोडला आहे, ज्यामुळे राज्यघटना पायदळी तुडवली जात आहे’, असा आरोप मुफ्ती यांनी ट्वीट करून केला आहे.

अन्य एका ट्वीटमध्ये मेहबूबा यांनी म्हटले आहे की, कलम ३७० असो, नागरिकत्व कायदा असो किंवा अल्पसंख्य आणि दलित यांच्यावर झालेली आक्रमणे असो, त्यांनी राज्यघटनेच्या नावावर भाजपची राजकीय कार्यसूची (अजेंडा) पूर्ण केली, अशीही टीका मुफ्ती यांनी केली.

संपादकीय भूमिका

अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे !