अस्लम शेख यांनी भेंडीबाजार आणि बेहराम पाडा येथेही मास्क लावण्याचा सल्ला द्यावा ! – संदीप देशपांडे, मनसे

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.

सहस्रो लोक विनामास्क फिरत असतील, तर दळणवळण बंदी टाळताच येणार नाही ! – आयुक्त इक्बालसिंह चहल 

मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

अभिनेत्री दीया मिर्झा यांनी स्वतःच्या विवाहामध्ये कन्यादान परंपरा वगळली !

कन्यादान करणार्‍या व्यक्तीच्या मागील १२ पिढ्या, पुढच्या १२ पिढी आणि स्वतःची १ पिढी यांचा उद्धार होतो, असे धर्मशास्त्र सांगते. मात्र फुकाचा पुरोगामीपणा मिरवण्यासाठी अशी टूम सध्या निघाली आहे. हिंदूंनी यापासून सावध रहावे !

नक्षलग्रस्त भागातून पुरवठा होत असलेला साडेतीन कोटी रुपयांचा गांजा विक्रोळी (मुंबई) येथे जप्त, २ जणांना अटक

गांजाची शेती करून नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम : विविध माध्यमांतून राष्ट्रविरोधी कारवाया करणारे नक्षलवादी आणि त्यांना सहकार्य करणारे राष्ट्रद्रोही यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

मुंबईतील झोपडपट्ट्यांतील धर्मांध महिलांचा अमली पदार्थांच्या अवैध धंद्यात मोठा सहभाग

जे सामान्यांना ठाऊक असते, ते पोलीस आणि शासन यांना ठाऊक नसते असे नव्हे. अवैध धंदे चालणार्‍या सर्वच ठिकाणांवर धाडी टाकून ते धंदे पूर्णतः संपवण्याची इच्छाशक्ती कोणते सरकार आणि त्यांचे पोलीस राबवणार ?, हा प्रश्न आहे !

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे नामकरण करणार !

मराठी शाळांना इंग्रजी नाव दिल्याने आधुनिक झाल्यासारखे वाटते का ? इंग्रजी नाव देऊन शिक्षणाचा दर्जा सुधारणार, असे वाटते का ? हे सर्व अतिशय हास्यास्पद आणि मराठीचा उद्घोष करणार्‍यांसाठी लाजिरवाणे आहे !

एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी 

१ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याने १०० एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी बोलावण्याचा निर्णय एस्.टी. महामंडळाने घेतला आहे.

१ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वेसेवा चालू होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

शासनाच्या नियमानुसार मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील.

(म्हणे) ‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा !’ – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी

मुंबईचा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा काहीही संबंध नसतांना वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न कर्नाटकचे उपमुख्यमंत्री करत आहेत, हेच स्पष्ट होते ! जर सीमावादातील भाग वादग्रस्त आहे, तर तो केंद्रशासित करण्यास काय अडचण आहे ?

लोकांना प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मण सवदी यांचे वक्तव्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

(म्हणे), ‘मुंबई कर्नाटकची असून त्यावर आमचा अधिकार आहे !’ – लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री, कर्नाटक