पालखेड (छत्रपती संभाजीनगर) येथील मंदिरातील दानपेट्या पळवल्‍या !

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) – येथील पालखेड गावातील पारेश्‍वर महादेव मंदिरातील दानपेट्या १० डिसेंबरच्‍या मध्‍यरात्री चोरांनी पळवल्‍याची घटना घडली. येथील यात्रा पार पडल्‍यानंतर या दानपेट्या उघडण्‍याची पद्धत आहे; मात्र त्‍यापूर्वीच त्‍या चोरून नेल्‍याची घटना घडली. मंदिराचे महंत स्‍वामी महिंद्रगिरीजी महाराज यांना ही घटना लक्षात आली. या दानपेट्या नंतर गावातील ओढ्याजवळ आढळल्‍या. (पोलिसांच्‍या अकार्यक्षमतेमुळे चोर हिंदु मंदिरात चोरी करण्‍यास धजावत आहेत. पोलीस हिंदु मंदिरांची सुरक्षा कधी व्‍यवस्‍थित करणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदूंची मंदिरे खर्‍या अर्थाने सुरक्षित रहाण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे अपरिहार्य आहे !