कोल्हापूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – महाद्वार रस्ता, ताराबाई रस्ता, लक्ष्मीपुरी या ठिकाणी व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर असू शकतात. तरी अशा घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. याच समवेत शहरात जे परप्रांतीय फेरीवाले आहेत, त्यांची ओळख लक्षात येण्यासाठी त्यांना ओळखपत्र सक्तीचे करावे, असे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी स्वीकारले. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.