पिंपरी (पुणे) येथील रुग्‍णालयातील लिपिकाच्‍या खातेनिहाय चौकशीचे आदेश !

रकमेतील अपहाराचे प्रकरण

जिजामाता रुग्‍णालय

पुणे – पिंपरीतील महापालिकेच्‍या जिजामाता रुग्‍णालयातील आर्थिक अपहाराच्‍या प्रकरणी आकाश गोसावी या लिपिकाची खातेनिहाय चौकशी चालू केली आहे. गोसावी यांनी १८ लाख ६६ सहस्र रुपये महापालिकेच्‍या कोषागारात विलंबाने भरल्‍याचे, तसेच त्‍या रकमेमध्‍ये अपहार केल्‍याचा आरोप केला होता. त्‍यानंतर प्राथमिक चौकशी समिती नेमली होती. या चौकशीमध्‍ये विभागप्रमुखांच्‍या शिफारसींमध्‍ये लिपिक गोसावी यांच्‍यावर हलगर्जीपणाचा, तसेच आर्थिक अपहार केल्‍याचा ठपका ठेवला होता. महापालिका आयुक्‍त शेखर सिंह यांनी खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला आहे. (प्राथमिक चौकशी समितीमध्‍ये आरोप सिद्ध झाले असतांना पुन्‍हा चौकशी समिती नेमण्‍याचे काय कारण ? समितीच्‍या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई का केली जात नाही ? – संपादक) त्‍यांच्‍यासह ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील शिपाई अनिल नाईकवाडे यांचीही खातेनिहाय चौकशी करणार आहे.