|
मुंबई – वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटात शिक्षा भोगत असलेला अबू सालेम याला पूर्ण २५ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, असा निर्णय दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने दिला आहे. ‘तो या प्रकरणातून लवकर सुटण्याचा हक्कदार नाही’, असे सांगत त्याची लवकर सुटका करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. विशेष न्यायाधीश व्ही.डी. केदार यांनी ११ जुलै २०२२ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत सालेमच्या गुन्ह्याच्या गंभीर स्वरूपामुळे त्याची शिक्षा अल्प करण्यासाठी कोणतेही विशेष विशेषाधिकार मिळत नाहीत, यावर भर दिला.