दंतेवाडा (छत्तीसगड) येथे ७ नक्षलवादी ठार

दंतेवाडा (छत्तीसगड) – दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर १२ डिसेंबरला सकाळी नक्षलवादी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत दुपारपर्यंत ७ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक सायंकाळपर्यंत चालू होती. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात नक्षलवाद्यांच्या विरोधात अजूनही शोधमोहीम चालू आहे. ती संपल्यावर याविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल. या वेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.