भारतीय बुद्धीबळपटू गुकेश बनला विश्‍वविजेता !

दोम्‍माराजू गुकेश

सिंगापूर – येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीतील १४ व्‍या निर्णायक डावात चीनच्‍या डिंग लिरेन याचा पराभव करून भारताचा १८ वर्षीय बुद्धीबळपटू दोम्‍माराजू गुकेश विश्‍वविजेता ठरला. गुकेश हा विश्‍वनाथन आनंद यांच्‍यानंतर विश्‍वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला आहे. सगळ्‍यात लहान वयाचा विश्‍वविजेता होण्‍याचा विक्रम आता गुकेशच्‍या नावावर नोंदला गेला आहे. लिरेन आणि गुकेश यांच्‍यातील अंतिम डाव अनिर्णित होण्‍याच्‍या मार्गावर होता; पण डिंग याच्‍या हातून घोडचूक घडली आणि त्‍याच्‍या हातातून सामना निसटला.

देवाचे खूप आभार ! – गुकेश

गुकेश विजयानंतर म्‍हणाला की,  मी जो क्षण अनुभवतो आहे तो अनुभवण्‍याचे प्रत्‍येक बुद्धीबळपटूचे स्‍वप्‍न असते आणि आज मी माझे स्‍वप्‍न जगतो आहे. सर्वांत आधी देवाचे खूप आभार.