हिंदु एकता आंदोलनाची प्रांत आणि तहसीलदार यांच्याकडे मागणी !
सांगली, १२ डिसेंबर (वार्ता.) – प्रतापगडावर अज्ञातांनी पुन्हा मोठे अनधिकृतपणे बांधकाम केले आहे. प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेऊन सदर जागेचा सातबारा उतारा आणि ८ अ उतारा कुणाच्या नावाने आहे ? सदर बांधकाम करतांना वन विभागाची अनुमती घेतली आहे का ? याची माहिती घेऊन सदरचे बांधकाम भुईसपाट करावे, अशी मागणी प्रतापगडावर शिवप्रतापदिनाच्या दिवशी उपस्थित असलेले वाई विभागाचे प्रांत आणि तहसीलदार यांच्याकडे ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी माजी नगरसेविका अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, हिंदु एकताचे शहर उपाध्यक्ष श्री. राजू जाधव, सांगलीवाडी विभागाचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध कुंभार, खणभाग विभाग अध्यक्ष श्री. अवधूत जाधव, प्रदीप निकम आदी उपस्थित होते.
श्री. नितीन शिंदे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्यांभोवती वन विभागाच्या भूमीवर असलेल्या अतिक्रमणांच्या विरोधात ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’ने २१ वर्षे लढा दिला. दोन्ही थडग्यांचे रूपांतर दर्ग्यामध्ये केले होते. अनेक वर्षे दर्ग्यामध्ये अफझलखानाच्या नावाने उरूस भरत होता. त्यामध्ये कोंबडी आणि बकरी यांचा बळी देऊन नवसही बोलले जात असे. शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करून प्रकार बंद पाडले.
अफझलखानाच्या नावाने निर्माण केलेल्या अनधिकृत दर्ग्यामध्ये १९ खोल्या, नमाज पढण्यासाठी बांधलेले अनधिकृत सभागृह महायुती सरकारने १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी बुलडोझर लावून पाडले होते. त्या बांधकामाचे सर्व साहित्य दरीत फेकून दिले होते. याला २ वर्षे पूर्ण होण्याच्या आधी तिथूनच जवळ असलेल्या ५०० फूट अंतरावर दरीत फेकून दिलेला पत्रा आणि लोखंडी अँगल यांचा वापर करून मोठे बांधकाम केले आहे. हे हिंदु एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळाने पहाणी केल्यानंतर निदर्शनास आले आहे.
संपादकीय भूमिका
|