एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी 

कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेत लोकल सेवा उपलब्ध नसेल, तर राज्य परिवहन मंडळाच्या बस रहित करून कसे चालेल ?

मुंबई – १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याने १०० एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी बोलावण्याचा निर्णय एस्.टी. महामंडळाने घेतला आहे.

मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी एक सहस्र एस्.टी. बस बेस्टच्या मार्गांवर धावत आहेत.  १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा चालू होत आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने एस्.टी. बस मुंबईतील सेवेतून (वाहतुकीतून) अल्प करण्यात येणार आहेत, असे एस्.टी.तील अधिकार्‍यांनी सांगितले.

गाड्या अल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्प करण्यात आलेल्या एस्.टी. बस रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि लातूर या विभागांत पाठवण्यात येणार आहेत.