बांगलादेशातील अल्पवयीन हिंदु मुलीने व्यक्त केली व्यथा !
कोलकाता – बांगलादेशात हिंदूंना निवडून लक्ष्य केले जात आहे. ‘इस्कॉन’शी संबंधित असलेल्या हिंदु कुटुंबांवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. अशा कुटुंबांतील मुलींना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून पळवून नेले जात आहे. ही भयावह परिस्थिती पाहून एक हिंदु अल्पवयीन मुलगी भारतात पळून आली आहे. बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने तिला कह्यात घेतले. ही मुलगी बांगलादेशातील पंचगढ जिल्ह्यातील असून ती आणि तिचे कुटुंब इस्कॉनशी संबंधित आहे.
बांगलादेशात हिंदु मुलींवर होत आहेत बलात्कार !
या मुलीने सांगितले की, बांगलादेशामध्ये हिंदु कुटुंबांतील सदस्यांना सतत धमक्या मिळत आहेत. विशेषतः मुलींना पळवून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हिंदु कुटुंबांतील मुलींवर बलात्कार करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. या आतंकवाद्यांपासून तिचे रक्षण करण्यासाठी तिच्या आजोबांनी तिला कसेतरी वाचवले आणि ते भारतीय सीमेत पोचले. बंगालमधील जलपाईगुडीतील बेलाकोबा येथे त्यांच्या नातेवाइकांच्या घरी जाण्यासाठी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असतांना भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्यांना कह्यात घेतले बांगलादेशी हिंदु मुलीने तिची व्यथा सांगितली.