टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त फेरी काढण्यास बंदी नाही !

महाराष्ट्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला माहिती

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – एम्.आय.एम्. (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाला टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त बारामती येथे फेरी काढण्याची अनुमती देण्यात आली नाही. या प्रकरणी पक्षाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने राज्य सरकारला विचारले की, ‘देशात टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त फेरी काढण्यावर बंदी आहे का ?  कायदा-सुव्यवस्था राखणे पोलिसांचे काम आहे. तुम्ही मार्ग पालटू शकता.’ यावर महाराष्ट्र सरकारने ‘टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त फेरी काढण्यास बंदी नाही’, असे म्हटले.

राज्य सरकारच्या वतीने युक्तीवाद करतांना अतिरिक्त सरकारी अधिवक्त्या क्रांती हिरवाळे म्हणाल्या, ‘‘पोलिसांचे म्हणणे आहे की, फेरीचे आयोजन केल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात; कारण इतर समाजाने विरोध केला आहे.’’ (जर असे आहे, तर मग सरकार पोलिसांचे आणि समाजाचे का ऐकत नाही कि सरकार अनुमती नाकारल्याने होणार्‍या विरोधाला घाबरत आहे ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • देशात टिपू सुलतानची जयंती कोण आणि कशासाठी साजरी करत आहेत ? अशांची मानसिकता हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या टिपू सुलतानप्रमाणेच असणार यात शंका नाही !
  • महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारच्या फेरीला अनुमती देऊ नये, असेच हिंदूंना वाटते !