अभिनेत्री दीया मिर्झा यांनी स्वतःच्या विवाहामध्ये कन्यादान परंपरा वगळली !

(म्हणे) ‘परिवर्तन हे आवडीनुसार चालू होते !’ – दीया मिर्झा यांचे विधान

कन्यादान करणार्‍या व्यक्तीच्या मागील १२ पिढ्या, पुढच्या १२ पिढी आणि स्वतःची १ पिढी यांचा उद्धार होतो, असे धर्मशास्त्र सांगते. विवाहाच्या वेळी नवरदेव याचे लक्ष्मीनारायणाच्या रूपात पूजन केले जाते आणि तसा भाव ठेवून सर्व विधी केल्यास त्याचा सर्वांनाच आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो; मात्र फुकाचा पुरोगामीपणा मिरवण्यासाठी अशा परंपरा वगळून त्यांचे समर्थन करण्याची टूम सध्या निघाली आहे. हिंदूंनी यापासून सावध रहावे !

दीया मिर्झा यांनी स्वतःच्या विवाहाचे पौरोहित्य शीला अट्टा या एका महिला पुरोहिताद्वारे करवून घेतले

मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री दीया मिर्झा यांनी उद्योगपती वैभव रेखी यांच्याशी १५ फेब्रुवारी या दिवशी हिंदु पद्धतीने विवाह केला. हा त्यांचा दुसरा विवाह आहे.

या वेळी पौरोहित्य शीला अट्टा या एका महिला पुरोहिताने केले. तसेच या वेळी कन्यादान करण्यात आले नाही. याविषयी दीया मिर्झा यांनी ट्वीट करत, ‘परिवर्तन हे आवडीनुसार चालू होते. महिलांना स्वतःसाठी स्वतः नियम बनवण्याची ही वेळ आहे.’