अस्लम शेख यांनी भेंडीबाजार आणि बेहराम पाडा येथेही मास्क लावण्याचा सल्ला द्यावा ! – संदीप देशपांडे, मनसे

डावीकडून अस्लम शेख आणि संदीप देशपांडे

मुंबई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. किमान स्वतःच्या मतदारसंघात एक चक्कर तरी मारावी, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मुंबईकरांना परत दळणवळणबंदी बघायची नसेल, तर त्यांनी स्वतःचे आणि कुटुंबाचे दायित्व घेतले पाहिजे, असे आवाहन अस्लम शेख यांनी केले होते. त्यावर मुसलमानबहुल असलेल्या स्वत:च्या मतदारसंघात प्रथम अशा प्रकारचे आवाहन करण्याचा सल्ला संदीप देशपांडे यांनी अस्लम शेख यांना दिला आहे.