गड (किल्ले) बनवण्‍याच्‍या स्‍पर्धेमध्‍ये छत्रपती शिवरायांचा इतिहास खर्‍या अर्थाने जागृत झाल्‍याचे समाधान मिळाले ! – राजू यादव

पुरस्‍कार विजेत्‍यांसमवेत राजू यादव आणि अन्‍य कार्यकर्ते

उंचगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) – वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि सिमेंटच्‍या जंगलात मुलांची मातीशी ओळख व्‍हावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श अन् शिवविचारांची गोडी लागावी, हाच उद्देश ठेवून गड (किल्ले) बनवण्‍याची स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली होती. स्‍पर्धेमध्‍ये छत्रपती शिवरायांचा इतिहास खर्‍या अर्थाने जागृत झाल्‍याचे समाधान मिळाले, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्‍या वतीने उंचगाव येथे भव्‍य गड बनवणे स्‍पर्धा आयोजित केली होती. त्‍यांच्‍या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते.

या स्‍पर्धेमध्‍ये पहिला क्रमांक बालवीर तरुण मंडळ त्रिमूर्ती गल्ली, दुसरा क्रमांक शिवशक्‍ती यादववाडी आणि ‘माने पार्क फ्रेंड्‍स सर्कल’ यांना तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक देण्‍यात आले. विजेत्‍यांना अनुक्रमे २ सहस्र १ रुपये, १ सहस्र ५०१ अन् १ सहस्र १ रुपये आणि सन्‍मानचिन्‍ह देण्‍यात आले. यात उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्‍यात आली. श्री. शरद माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आणि सूत्रसंचालन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी, सर्वश्री विराग करी, योगेश लोहार, आबा जाधव यांसह अन्‍य उपस्‍थित होते.