पतंजलि, डाबर, झंडू, बैद्यनाथ आदी १३ मोठी आस्थापने मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकतात ! – सी.एस्.ई.चा दावा

पतंजलि आणि डाबर यांनी या चाचणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पतंजलि चे म्हणणे आहे की, नैसर्गिकरित्या मध बनवणार्‍या आस्थापनांच्या अपकीर्तीचा हा प्रयत्न आहे !, तर डाबर चे म्हणणे आहे की, जो अहवाल समोर आला आहे, तो प्रायोजित आहे !

कुडाळ तहसीलदारांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा वाळूमाफियांवर गुन्हा नोंद 

अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असतांना २८ नोव्हेंबरला मध्यरात्री २ वाजता तालुक्यातील आंदुर्ले खिंड येथे वाळूमाफियांनी कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

नवी मुंबईत चाचणी न केलेल्या व्यक्तींचे कोरोना अहवाल दिले !

कहर म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचाही कोरोनाचा पडताळणी अहवाल देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

न्यायालयांकडून काही प्रकरणांत मर्यादांचे उल्लंघन !- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करणे योग्य नाही; या तिघांनी सुसंवाद राखत एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करता कामा नये. सर्व घटकांनी एकमेकांचा आदर करून मर्यादाभंग टाळला पाहिजे.

म्हैसुरू (कर्नाटक) येथे दलिताचे केस कापणार्‍या केशकर्तनालयाच्या मालकाला ५० सहस्र रुपयांचा दंड आणि सामाजिक बहिष्कार

हिंदु धर्मात ईश्‍वरनिर्मित वर्णाश्रमव्यवस्था आहे आणि त्यात जाती नाहीत. जाती या मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे ईश्‍वरी राज्यात म्हणजेच हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचा जातीभेद नसल्याने कुणावरही अन्याय होणार नाही !

पुण्यातील ससून रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांना विद्यार्थ्यांची धक्काबुक्की अन् मारहाण

असे विद्यार्थी देशाचे भवितव्य काय घडवणार ?

तहसीलदारांनी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार

दळणवळण बंदीच्या काळात येथील खानापूर तालुक्यात मार्च २०२० ते मे २०२० पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही या काळात पेंडल व्यवस्था, पोलीस बॅरिकेट्स, जेवण, ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ आणि इतर कामे यांसाठी ७५ लाख रुपये व्यय दाखवण्यात आला आहे.

केरळ राज्यात आता सामाजिक माध्यमांवर ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्यास ५ वर्षे कारावासाची शिक्षा

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केरळ पोलीस कायद्यात कलम ११८ (अ) समाविष्ट करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे.

समष्टी साधना म्हणून अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना समाजातील लोकांची अपेक्षित प्रगती न होण्यामागील लक्षात आलेले अपसमज !

समाजातील बरेच जण अध्यात्मातील अपसमज समजून न घेतल्यामुळे बरीच वर्षे साधना करुनही त्यांची आध्यात्मिक प्रगती झालेली दिसत नाही. याची काही उदाहरणे पाहूया.

नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यावर गोव्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी !

देणगीचे हे पैसे शिक्षण, युवकांना रोजगार, सामूहिक कृषी लागवड, आरोग्य रक्षण, क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा आदींवर खर्च केल्यास योग्य झाले असते. या देणगीचा शेवटी प्रतिमादहन करून धूरच होत असतो. मुलांना योग्य ते देण्याची आता वेळ आली आहे.