म्हैसुरू (कर्नाटक) येथे दलिताचे केस कापणार्‍या केशकर्तनालयाच्या मालकाला ५० सहस्र रुपयांचा दंड आणि सामाजिक बहिष्कार

हिंदु धर्मात ईश्‍वरनिर्मित वर्णाश्रमव्यवस्था आहे आणि त्यात जाती नाहीत. जाती या मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे ईश्‍वरी राज्यात म्हणजेच हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचा जातीभेद नसल्याने कुणावरही अन्याय होणार नाही !

म्हैसुरू (कर्नाटक) – येथील हल्लारे गावामधील मल्लिकार्जुन शेट्टी यांच्या केशकर्तनालयामध्ये दलित व्यक्तीचे केस कापल्यावरून शेट्टी यांना गावकर्‍यांकडून ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच यामुळेच गेल्या काही दिवसांपासून शेट्टी यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे. शेट्टी यांना यापूर्वीच दलितांचे केस न कापण्याविषयी सांगण्यात आले होते.

१. शेट्टी यांनी सांगितले की, याविषयी पोलिसांत तक्रार करण्याचे सांगितल्यावर मला मारहाण करण्यात आली आणि माझ्याकडील ५ सहस्र रुपये हिसकावून घेण्यात आले.

२. या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, शेट्टी स्वतःहून तक्रार करू इच्छित नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात येईल.