शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी केले होते कार्यक्रमाचे आयोजन
परळी (जिल्हा बीड) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक जिल्ह्यांत विविध उपक्रम साजरे करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर केक खाण्यासाठी व्यासपिठावर कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. याचा व्हिडिओही सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या परळी मतदारसंघात अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीत शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात ८१ किलोचा केक आणण्यात आला होता, तो केक गोविंदा आणि धनंजय मुंडे यांच्या हस्ते कापण्यात आला होता. कार्यक्रमानंतर कार्यकर्ते धुळवड खेळल्याप्रमाणे एकमेकांच्या तोंडाला केक लावत होते. (असे विकृतीचे प्रदर्शन करणारे कार्यकर्ते समाजासाठी काय काम करणार ? – संपादक)