उद्घाटनाआधीच काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून २०० किमी प्रतिघंटा वेगाने गाडी चालवली !

महाविकास आघाडी सरकार २ मे या दिवशी या महामार्गाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करत आहे. असे असतांना याच सरकारमधील एका पक्षाच्या नेत्याने येथे गाडी चालवणे कितपत योग्य आहे ?

मंदिरे, गड-दुर्ग आणि स्मारके यांचे जतन आणि संवर्धन शास्त्रोक्त अन् कालबद्धरित्या करण्यात यावे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मंदिरे, गड-दुर्ग आणि संरक्षित स्मारके यांचे काम करतांना त्यांचे मूळ रूप, स्थानमाहात्म्य अन् इतिहास हे लक्षात घेऊन केले जावे.

घटनाद्रोही आदेश !

‘नाशिक येथे मनसेचा अधिक जोर असल्याने असे करण्यात आले आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी नाशिक पोलीस हिंदूंनाच दाबण्याचा प्रयत्न याद्वारे करत आहेत. त्यामुळे हा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे अपरिहार्यच आहे !

मुंबईत दंगल घडवणार्‍या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची उपस्थिती !

दंगलखोरांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे पोलीस अधिकारी गुन्हेगारी कशी रोखणार ?

(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचा प्रयत्न चालू !’ – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी हिंदूंनी मिरवणुका काढायच्या नाहीत, ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायच्या नाहीत, असेच गृहमंत्र्यांना वाटते का ?

नाशिक येथील म्हाडा घोटाळाप्रकरणी ११७ विकासकांची झाडाझडती चालू !

महापालिका क्षेत्रात १ एकरपेक्षा अधिक भूमीवर गृहप्रकल्प उभारला, तर त्यातील ३० टक्के घरे ही आर्थिक दुर्बल घटकांना देणे बंधनकारक आहे; मात्र येथे या नियमाला हरताळ फासण्यात आला.

प्रचाराच्या कालावधीत मी काहीही चुकीचे बोललो नाही ! – धनंजय महाडिक, भाजप

काल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. केवळ २ उमेदवारांची तुलना करत ‘प्लंबरचे काम ‘प्लंबर’ करेल आणि ‘इलेक्ट्रिशियन’चे काम ‘इलेक्ट्रिशियन’ करेल, असे म्हणालो होतो.

न्यायालयाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

धार्मिक स्थळांवर भोंगे लावू नयेत, असा सर्वाेच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतांना उपमुख्यमंत्र्यांची भूमिका मात्र गुळमुळीत !

गुढीपाडव्‍यापासून भक्तांना श्री विठ्ठलाचे पदस्‍पर्श दर्शन घेता येणार !

कोरोनाच्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे पदस्‍पर्श दर्शन बंद ठेवण्‍यात आले होते; मात्र आता कोरोनाचा संसर्ग न्‍यून झाल्‍याने वारकरी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्‍या पदाधिकार्‍यांनी पदस्‍पर्श दर्शन चालू करण्‍याची मागणी केली होती.

पंजाब राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील आमदारांना केवळ एकाच कार्यकाळाचे सेवा निवृत्तीवेतन द्यावे ! – दत्ताजीराव देसाई, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस

अशी दुहेरी पदे भूषवणारे आमदार किंवा खासदार यांना दुहेरी सेवा निवृत्तीवेतन देण्याची आवश्यकता काय ?