१३ फेब्रुवारीला प्रस्थान

शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) – अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा कृपाशीर्वाद आणि प्रेरणेने प्रतिवर्षीप्रमाणे श्रीदत्त देवस्थान शेवगाव ते श्रीक्षेत्र गाणगापूर पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचे १३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी प्रस्थान होणार आहे. दिंडीत सहभागी होऊ इच्छिणार्या भाविक-भक्तांनी त्वरित आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन श्रीदत्त देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. पायी पालखी दिंडी सोहळ्याचे यंदाचे १४ वर्षे आहे.
३७५ किलोमीटर अंतराचा पल्ला दिंडीतील भाविक १३ दिवसांत पार करणार आहेत. दिंडी सोहळा कोरडगाव, शिरूर कासार, डोंगरकिनी, पाटोदा, ईट, भूम, बार्शी, उपळे दुमाला, तुळजापूर, इटकल, अक्कलकोट, दुधनी मार्गे २५ फेब्रुवारीला श्रीक्षेत्र गाणगापूर येथे पोचणार आहे. तेथे सर्व भाविक भीमा-अमरजेच्या पवित्र संगमावर स्नान करून निर्गुण मठातील सद्गुरु श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेऊन ‘गुरुचरित्र’ या प्रासादिक ग्रंथाचे पारायण करणार आहेत. गाणगापूर क्षेत्री ते माधुकरी मागतील.
२७ फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्रीला नजीकच्या श्री कल्लेश्वर महादेवाला अभिषेक करून वाहनाने अक्कलकोटमार्गे परतीच्या प्रवासाला प्रारंभ करतील. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन ते शेवगावला पोचतील. दिंडीत सहभागी होऊ इच्छिणार्या भाविक-भक्तांनी अर्जुन फडके (९८५००३२१२७), पी.बी. शिंदे (९४२३४६७८३०), प्रदीप हारके (९४२३४६७८५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखीत योगानंद चंदन पादुका !प.पू. दादाजी वैशंपायन यांना हिमालयाच्या भटकंतीत साक्षात् परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या ‘योगानंद चंदन पादुका’ या पालखीत असतात. समवेत दादाजींची प्रतिमा, तसेच ‘गुरुचरित्र’ हा प्रासादिक ग्रंथ असतो. योगानंद पादुका या दिंडीतील भाविक-भक्तांसाठी सुरक्षा कवच मानले जाते. |