मुंबईत दंगल घडवणार्‍या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची उपस्थिती !

दंगलखोरांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे पोलीस अधिकारी गुन्हेगारी कशी रोखणार ? – संपादक

डावीकडून तिसरे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे

मुंबई – वर्ष २०१२ मधील आझाद मैदानात दंगल घडवणार्‍या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित राहिले. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी संजय पांडे यांचे ‘इफ्तार पार्टी’तील छायाचित्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केले आहे. (रझा अकादमी आयोजित आझाद मैदानातील दंगलीच्या वेळी जिहाद्यांकडून महिला पोलिसांचे कपडे फाडण्यात आले. म्यानमार येथील मशिदी पाडल्याच्या अफवा पसरवून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत रझा अकादमीनेच दंगल घडवली. अशा समाजविघातक आणि राष्ट्रघातकी संघटनेच्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त उपस्थित रहात असतील, तर हा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणी सरकारने कारवाई करावी ! – संपादक)

देशविरोधी कृती करणार्‍यांना प्रोत्साहित करण्याचे सरकारचे धोरण आहे का  ? – आमदार नीतेश राणे, भाजप

रझा अकादमीने सतत देशविरोधी भूमिका घेतली आहे. एका बाजूला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधीमंडळात रझा अकादमीवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे सांगतात; मात्र दुसर्‍या बाजूला त्यांचेच अधिकारी रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला उपस्थित रहातात. ज्या रझा अकादमीने आझाद मैदानात अमर जवान स्मारक तोडले आणि महिला पोलीस भगिनींशी गैरवर्तन केले, अशा देशविरोधी कृती करणार्‍यांच्या इफ्तारमध्ये सहभागी होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे, हे महाविकास आघाडीचे धोरण राबवण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव आहे का ?