शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल; मात्र आमदारांनी २४ घंट्यांत मुंबईत यावे ! – खासदार संजय राऊत
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी आमदारांची इच्छा असेल, तर आम्ही बाहेर पडू; मात्र शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी २४ घंट्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी, असे आवाहन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले.