सातारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधिशांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज !

५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

सत्र न्यायाधीश धनंजय निकम

मुंबई – लाचखोरीचा आरोप असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. आरोपीला जामीन देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांनी प्रविष्ट केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती एन्.आर. बोरकर यांनी १५ जानेवारी या दिवशी चेंबरमध्ये सुनावणी घेण्यास सिद्धता दर्शवली आहे.