३ ऑगस्ट या दिवशी विधीमंडळ सदस्यांसाठी होणार ध्यानयोग शिबिर !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – विधीमंडळातील सदस्यांकरिता ३ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘समर्पण ध्यानयोग’ या एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी अन् कर्मचारी कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात येणार आहे. या वेळी स्वामी शिवकृपानंद महाराज यांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन आणि ध्यान प्रात्यक्षिके हा कार्यक्रम होणार आहे. याविषयी आवाहन करतांना विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मानसिक तणावावर मात करण्यासाठी ध्यानसाधना पूरक ठरत आहे. त्यादृष्टी सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे’, असे आवाहन केले आहे.