कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी पुढे ढकलली

पुणे – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये चालू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सचिव व्ही.व्ही. पळणीटकर यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे. पुढील सुनावणी मुंबई येथील कार्यालयात ४ एप्रिलपासून चालू करण्यात येईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.