हिंदुत्वाचा र्‍हास होत असतांना निद्रिस्त असलेले केरळमधील हिंदू !

काश्मिरी पंडितांविषयी काय झाले, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. हिंदूंना इतिहासापासून शिकायची इच्छा नाही. जोपर्यंत संकट दारापर्यंत येत नाही, तोपर्यंत ते विश्‍वास ठेवत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील हिंदू !

‘अपनी पार्टी’ परकीच !

काश्मीरमध्ये ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष’ म्हणजे ‘पीडीपी’त पूर्वी कार्यरत असलेले तत्कालीन अर्थमंत्री सईद अल्ताफ बुखारी यांनी हा पक्ष स्थापन केला आहे.